Hinjawadi crime News: जबरदस्तीने घरात घुसून दागिने, रोकड पळवली; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – जबरदस्तीने घरात घुसून चार जणांनी मिळून 21 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख 19 हजार 400 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. ही घटना 14 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री सव्वा बारा वाजता सिद्धार्थ नगर, बावधन येथे घडली असून याबाबत 23 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समीर सिंग, रवी राठोड, लोकेश तिवारी, फॅडी खान (सर्व रा. बावधन) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत विकास कुमार शरयू (वय 30, रा. सिद्धार्थनगर, बावधन. मूळ रा. बिहार) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे फिर्यादी यांच्या घरात मध्यरात्रीच्या वेळी जबरदस्तीने घुसले. त्यांनी फिर्यादी विकास आणि त्यांचा मित्र अमरजित कुमार यांना विनाकारण शिवीगाळ करून बेल्टने मारहाण केली.

विकास यांच्या गळ्यातील सोन्याचे चेन, हातातील अंगठी असे 21 ग्रॅम वजनाचे 85 हजारांचे सोन्याचे दागिने आणि 34 हजार 400 रुपयांची रोकड असा एकूण एक लाख 19 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेला.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.