Hinjawadi Crime News : बस प्रवासादरम्यान प्रवासी महिलेसोबत वाद घालून दरोडा घालणाऱ्या चार महिलांना अटक

एमपीसी न्यूज – बस प्रवासादरम्यान विनाकारण महिलेसोबत वाद घालून तिच्याकडील साहित्य जबरदस्तीने चोरणाऱ्या महिलांच्या टोळीला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या तब्यत दिले.

पोलिसांनी टोळीतील चार महिलांना अटक केली असून तीन महिला पळून गेल्या आहेत. ही घटना रविवारी (दि.13) दुपारी तीन वाजताच्या सुमारास सुतारवाडी ते राधाचौक दरम्यान मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर घडली.

_MPC_DIR_MPU_II

सारिका राम बडबुक्की (वय 20), पल्लवी राम बडबुक्की (वय 22), भवानी मंजेनाथ बडबुक्की (वय 32), दीपा सेनू बडबुक्की (वय 22, सर्व रा. टेंभुर्णी, ता. माढा, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत. त्यांच्यासह त्यांच्या अन्य तीन साथीदार महिलांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अर्चना मनोहर देवकर (वय 37, रा. घाटकोपर वेस्ट, मुंबई) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देवकर रविवारी कराड ते मुंबई असा बसमधून प्रवास करत होत्या. दुपारी तीन वाजताच्या सुमारास सुतारवाडी ते राधाचौक दरम्यान सात महिलांनी फिर्यादी यांच्याकडे जाऊन त्यांच्यासोबत वाद घातला. फिर्यादी यांना धक्काबुक्की करून बस राधाचौकात थांबली असता आरोपी महिलांनी जबरदस्तीने फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. तसेच 10 हजार रूपये रोख रक्कम आणि दागिने असा एकूण एक लाख 83 हजार 200 रुपयांचा ऐवज पळून जाण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी त्या महिलांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.