_MPC_DIR_MPU_III

Hinjawadi Crime News : फार्म हाऊस प्लॉट खरेदीच्या बहाण्याने नऊ जणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज – फार्म हाऊससाठी प्लॉट घेण्याच्या बहाण्याने नऊ जणांकडून पैसे घेतले. त्या पैशांच्या मोबदल्यात त्यांना फार्म हाऊस प्लॉट न देता तसेच त्यांचे पैसे परत न करता त्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_IV

साईरंग डेव्हलपर्स प्रा . ली. चे संचालक के. आर. मलिक, शाहरुख मलिक, कार्यकारी संचालक नंदिनी रणजित कोंढाळकर, पीटर आणि इतर पदाधिकारी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत सुयोग संतोष नाटेकर यांचे कुलमुखत्यार संतोष वासुदेव नाटेकर (वय 63, रा. कर्वेनगर, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हा प्रकार 10 फेब्रुवारी 2012 ते 1 मार्च 2021 या कालावधीत साईरंग डेव्हलपर्स आणि प्रमोटर प्रा. ली. हिंजवडी फेज दोन येथे घडला.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फार्म हाऊस प्लॉट खरेदी करण्यासाठी आरोपींनी फिर्यादी यांच्यासोबत मेमोरंडम ऑफ अंडरस्टॅण्डिंग (एमओयू) केला. प्लॉटच्या खरेदीसाठी आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून 13 लाख 5 हजार रुपये घेतले. तसेच आरोपींनी अन्य आठ गुंतवणूकदारांकडून एक कोटी 85 लाख 18 हजार 800 रुपये घेतले.

घेतलेल्या रकमेवर सर्वांना आठ ते 18 टक्के व्याज देण्याचे आरोपींनी आमिष दाखवले. त्यानंतर फिर्यादी आणि अन्य गुंतवणूकदारांना ठरल्याप्रमाणे फार्म हाऊस प्लॉट न देता रकमेच्या परताव्याची रक्कम सुमारे चार कोटी 30 लाख रुपयांची फसवणूक केली.

ॲग्रीमेंटमधील ठरलेली ठेव रक्कम कायदेशीर मार्गाने देता येऊ नये यासाठी आरोपींनी गुंतवणूकदारांना पुढील तारखेचे धनादेश दिले. धनादेश वटण्या अगोदरच आरोपींनी दिलेल्या धनादेशाचे पेमेंट बँकेला सांगून स्टॉप केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.