Hinjawadi Crime News : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार करीत 11 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून महिलेची 11 लाखांची फसवणूक केली. तसेच तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचारही केले. याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोनित डी. कपूर ऊर्फ संदीप दादाराव वायभिसे (वय 34, रा. वडगाव शेरी, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 31 वर्षीय महिलेने रविवारी (दि. 18) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वायभिसे याने फिर्यादी तरुणीला बीटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पैसे घेतले. तसेच सिंगापूर येथे नोकरीकरिता, नर्सिंग कोर्सकरिता वेळोवेळी पैसे घेतले. फिर्यादी महिलेचे क्रेडिट आणि डेबीट कार्ड वापरून अनेक गोष्टींची खरेदी करीत 11 लाखांची फसवणूक केली. तसेच लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादी यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.