Hinjawadi crime News : हॉटेल व्यवसायात भागीदारी करण्याच्या बहाण्याने 52 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – हॉटेल व्यवसायात भागीदारी देण्याचे आश्वासन देऊन एका व्यावसायिकाची 52 लाखांची फसवणूक केल्याची घटना हिंजवडी परिसरातील ‘यारा दि हवेली’ या हॉटेलमध्ये 16 ऑक्टोबर 2018 ते 31 मार्च 2021 या कालावधीत घडली.

जितेंद्र वेदप्रकाश पुरी उर्फ जितराज पुरी उर्फ बॉबी पुरी, सुरभी मिश्रा उर्फ सुरभी जितेंद्र पुरी उर्फ चेतना उदय इलापाते (दोघे रा. गहुंजे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत श्रीकांत विठ्ठलराव गिरी (वय 33, रा. चिखली) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी त्यांच्या हॉटेल व्यवसायात फिर्यादी यांना भागीदार करून घेण्याचे आमिष दाखवले. त्याबाबत आरोपी आणि फिर्यादी यांच्यात करारनामा देखील झाला.

त्यानंतर वेळोवेळी आरोपींनी 20 लाख 85 हजार रुपये बँक खात्यावर आणि 30 लाख रुपये रोख स्वरूपात घेतले. पैसे घेऊन फिर्यादी यांना भागीदारी न देता त्यांची 52 लाख 400 रुपयांची आरोपींनी फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.