Hinjawadi Crime News : खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत गुन्हेगारास गावठी पिस्टलसह अटक

एमपीसी न्यूज – खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात फरारी असलेल्या एका आरोपीला हिंजवडी पोलिसांनी सापळा लावून अटक केली. तो आरोपी पिस्टल घेऊन येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला चांदणी चौकात बावधन ब्रिजच्या खाली सापळा लावून अटक केली. त्याच्याकडून गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

औंदुबर ऊर्फ मोन्या रविंद्र नाकते (वय 25, रा. गोपळकृष्ण विकास मंडळ, गोखलेनगर, पुणे. मुळ गाव मु. दखने, ता. मुळशी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी परिसरात गस्त घालत असताना पोलीस नाईक अतिक शेख यांना माहिती मिळाली की, एक तरुण चांदणी चौकात बावधन ब्रिजच्या खाली गावठी रिव्हॉल्हरसह येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी चांदणी चौकात सापळा लावून आरोपी औदुंबर याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली.

पोलिसांनी हा 31 हजारांचा ऐवज जप्त केला. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता तो हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात फरार असल्याचे निदर्शनास आले.

अटक केलेला आरोपी हा रेकॉडवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात चतुशृंगी, पौड, देहूरोड, हिंजवडी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, परिमंडळ दोनचे पोलीस उप आयुक्त आनंद भोईटे, वाकड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलीस निरीक्षक अजय जोगदंड, तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काटे, उध्दव खाडे, उपनिरीक्षक समाधान कदम, एम. बी. गाढवे, पोलीस अंमलदार बंडू मारणे, महेश वायवसे, बाळकृष्ण शिंदे, नितीन पराळे, कुणाल शिंदे, अतिक शेख, रितेश कोळी, चंद्रकात गडदे, कारभारी पालवे, श्रीकांत चव्हाण, अमर राणे, सुभाष गुरव, दत्तात्रय शिंदे, झनक गुमलाडु, ओमप्रकाश कांबळे, नुतन कोडे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.