Hinjawadi Crime News : कासारसाई येथे रात्रीच्या वेळी घरातून सोन्या, चांदीच्या वस्तू, रोख रक्कम चोरीला

एमपीसी न्यूज – रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी घरातून सोन्या-चांदीच्या वस्तू आणि रोख रक्कम असा एक लाख 9 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 5) सकाळी सव्वासहा वाजता कासारसाई येथे उमाजीनगर येथे उघडकीस आली. 

_MPC_DIR_MPU_II

अमरदीप पोपट बोराडे (वय 25, रा. उमाजीनगर पाण्याचा टाकीजवळ, कासारसाई) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातून अज्ञात चोरट्यांनी सोन्याच्या आणि चांदीच्या वस्तू तसेच रोख रक्कम असा एकूण एक लाख 9 हजारांचा ऐवज चोरून नेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.