Hinjawadi Crime News : विक्रीसाठी आणलेला सव्वा लाखाचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज – विक्रीसाठी आणलेला एक लाख 23 हजार 552 रुपयांची सुगंधी तंबाखू आणि गुटखा पोलिसांनी पकडला. ही कारवाई गुरुवारी (दि. 29) हिंजवडी, जांबे रोड येथे करण्यात आली.

हेमाराम अम्राराम प्रजापती (वय 28 रा. मगरवस्ती मु.पो. जांबे ता. मुळशी) आणि माल देणारा गुजरातमधील व्यक्ती (नाव पत्ता माहीत नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस कर्मचारी रवि प्रकाश पवार यांनी गुरुवारी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी सव्वा सात वाजताच्या सुमारास कोलते पाटील सोसायटी ते जांबे रोडवर आरोपी (एम एच 14 / एच जी 4228) टेम्पोमधून गुटखा विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी टेम्पोची पाहणी केली असता त्यामध्ये एक लाख 23 हजार 552 रुपयांची सुगंधित तंबाखू व गुटखा मिळून आला. टेम्पोसह पोलिसांनी चार लाख 73 हजार 552 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.