Hinjawadi Crime News : दमदाटी करून 119 ब्रास मुरूम चोरला

एमपीसी न्यूज – चार जणांनी मिळून मुळशी तालुक्‍यातील कासारसाई येथे एका जागेतून बेकायदेशीरपणे, दमदाटी करून 119 ब्रास मुरूम चोरून नेला. ही घटना दोन मे रोजी दुपारी घडली.

जयवंत ज्ञानदेव साळुंखे (वय 48, रा. कॅम्प, पुणे) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तुकाराम शितोळे, प्रवीण वाघचौरे आणि अन्य दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या जागेतून दीड लाख रुपये किमतीचा 119 ब्राॅस मुरूम जेसीबी आणि ट्रॉलीच्या सहाय्याने चोरून नेला. मुरूम चोरून नेत असताना फिर्यादी यांचे साईट मॅनेजर यांनी आरोपींना विरोध केला असता त्यांना आरोपींनी शिवीगाळ आणि दमदाटी केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.