Hinjawadi Crime News : हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर हिंजवडी पोलिसांचा छापा; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर हिंजवडी पोलिसांनी सोमवारी (दि. 2) रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास छापा मारून कारवाई केली. यात दोघांना अटक करण्यात आली आहे.

हॉटेल मॅनेजर प्रबुद्ध आत्तम बनसोडे (वय 25, रा. शिवाजी चौक, हिंजवडी), संघर्ष फुलचंद भुतके (वय 23, रा. शिवाजी चौक, हिंजवडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह हॉटेल चालक मालक वैभव वारडे (वय 32, रा. आकुर्डी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी मधील विनोदेनगर येथे असलेल्या ठेक्का हॉटेलमध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास सापळा लावून कारवाई केली. त्यावेळी हॉटेलमध्ये काहीजण बेकायदेशीरपणे हुक्का पीत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी कारवाई मध्ये 23 हजार 550 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच हॉटेल मॅनेजर असलेल्या दोघांना अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.