Hinjawadi Crime News : वजन काट्याला मशीन लावून मालाचे वजन वाढवले; चार लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – स्टील मालाचे वजन करण्यासाठी गाडी आणल्यानंतर वजन काट्याला मशीन लावून गाडीसह गाडीतील स्टीलचे सुमारे आठ टन वजन वाढवले. यामध्ये चार लाखांची फसवणूक केली. हा प्रकार मंगळवारी (दि. 4) सकाळी यश्विन कंस्ट्रक्शन साइट हिंजवडी फेज तीन येथे घडला.

याप्रकरणी सुरज नारायण थोरात (वय 24, रा. चिखली), धनाजी गोविंद कांबळे (वय 35, रा. काळेवाडी) या दोघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत सर्वेश विलास जावडेकर (वय 39, रा. कोथरूड, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची हिंजवडी फेज तीन येथे बांधकाम साईट सुरू आहे. बांधकाम साईटवर कामासाठी आणलेल्या स्टीलचे वजन गाडीसह 26.700 टन एवढे असताना ते वाढवून गाडीसह 34.035 एवढे दाखवले. यासाठी आरोपींनी वजनकाट्याला मशीन लावली. यामध्ये आरोपींनी चार लाख रुपयांची फसवणूक केली.

या प्रकरणात पार्श्वनाथ सेल्स कार्पोरेशन यांच्यावर देखील फिर्यादी यांचा संशय आहे. तसेच मार्च 2019 च्या ऑडिटमध्ये निदर्शनास आलेले पावणे दोनशे टन स्टील तफावत प्रकरणात देखील पार्श्वनाथ सेल्स कार्पोरेशनचे केतन भंडारी यांच्यावर फिर्यादी यांचा संशय असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.