Hinjawadi Crime News : नेटवर्क हॅक करून कंपनीच्या ऑनलाइन कामात अडथळा

एमपीसी न्यूज – किर्लोस्कर ब्रदर्स कंपनीचे ऑनलाइन कामाचे नेटवर्क हॅक करून कामकाजात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी अज्ञात व्यक्‍तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बाणेर, पुणे येथे घडली.

सुनील अंबादास खानझोडे (वय 56, दिनार अपार्टमेंट, विजयनगर, पुणे) यांनी गुरुवारी (दि. 6) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पब्लिक आयपी ऍड्रेस 106.210.246.60 याचा वापर करणाऱ्या अज्ञात व्यक्‍तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खानझोडे हे बाणेर येथील किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड या कंपनीत आयटी मॅनेजर म्हणून कामाला आहेत. 18 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास पब्लिक आयपी ऍड्रेस 106.210.246.60 याचा वापर करणाऱ्याने कंपनीच्या आयपी ऍड्रेसमध्ये घुसखोरी करून पासवर्ड बंदली केला.

तसेच कंपनीच्या सुपर ऍडमीनच्या कामात अडथळा आणून ऑनलाइन कामकाज बंद पाडले. पोलीस निरीक्षक अजय जोगदंड याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.