Hinjawadi Crime News : डान्स टीचरकडून तरुणीचा विनयभंग

एमपीसी न्यूज – डान्स टीचरने एका महिलेच्या घरात जाऊन तिच्या गावाकडील मुलीसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करत अश्लील कृत्य करून विनयभंग केला. ही घटना बुधवारी (दि. 5) रात्री हिंजवडी परिसरात घडली.

संदिप जगदीश परदेशी (वय 40, रा. वारजे माळवाडी, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी डान्स टीचरचे नाव आहे. याबाबत 31 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संदीप हा डान्स टीचर आहे. त्याने फिर्यादी यांच्या गावाकडील मुलीसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तसेच जवळीक साधण्यासाठी बुधवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास आरोपी फिर्यादी यांच्या घरातील बाथरूममध्ये गेला.

फिर्यादी यांच्या मुलीला आवाज देऊन डर्मिकूल पावडर मागण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांच्या गावाकडील मुलीसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याने अश्लील कृत्य करत मुलीचा विनयभंग केला.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.