Hinjawadi Crime News : बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनीची परस्पर विक्री; आठ जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – जमीन मालक असल्याचे भासवून खोटी कागदपत्रे तयार करून त्याआधारे पाच गुंठे जमीन परस्पर विकली. याबाबत आठ जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना 4 डिसेंबर 2020 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत बाणेर येथे घडली.

दिलीप बळीराम पवार (वय 49, रा. लोहगाव, पुणे), संतोष देशमाने, डी. एन. देशमाने, नवनाथ पत्की, एक महिला आरोपी, अब्दुल रहमान रामचंद्र दुर्राणी (रा. पुणे), नजीम शेखलाल शेख (रा. नागपूर चाळ, येरवडा), एक नाव धारण केलेला बनावट इसम अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत राजेश नंदलाल जोशी (वय 62, रा. कोथरूड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या वडिलांच्या नावावर बाणेर येथे पाच गुंठे जमीन आहे. त्या जमिनीची बनावट कागदपत्रे आरोपींनी तयार केली. बनावट आधारकार्ड, पनकार्ड तयार करून जागेची पॉवर ऑफ अटर्नी विसार पावती, खरेदी खत तयार केले.

सर्व बनावट कागदपत्रे तयार करून ती खरी असल्याचे आरोपींनी शासकीय कार्यालयात दाखवले. बनावट खरेदी खताच्या आधारे ती जमीन दुस-या व्यक्तीला विकून फिर्यादी आणि सरकारची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.