Hinjawadi crime News : अश्लील मेसेज, लग्नाची मागणी आणि शारीरिक संबंधांसाठी धमकावले

दोघांवर विनयभंगाचा गुन्हा

एमपीसी न्यूज – लग्नाची मागणी घालत महिलेच्या मोबाईलवर अश्लील मेसेज पाठवले. तसेच तिला धमकावले. याबाबत दोन जणांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 16 नोव्हेंबर 2020 ते 10 फेब्रुवारी 2021 या कालावधीत एक्झर्बिया टाऊनशिप, हिंजवडी येथे घडली.

बिपीन श्रीमंत कांबळे (वय 31, रा. एक्झर्बिया टाऊनशिप, हिंजवडी. मूळ रा. बीड), आदित्य ज्ञानेश्वर चांगोले (वय 24, रा. हिंजवडी. मूळ रा. नागपूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बिपीन याने पीडित महिलेला लग्नाची मागणी घातली. तसेच तिच्या मोबाईल फोनवर अश्लील मेसेज पाठवून, फोनवर व प्रत्यक्ष फिर्यादीकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. त्यासाठी महिलेला धमकावले. तसेच आरोपी आदित्य याने महिलेला तिच्या घरात घुसून मारहाण केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.