Hinjawadi crime News : मारुंजी येथील घरफोडीत दीड लाखांची रोकड लंपास

एमपीसी न्यूज – अज्ञात चोरट्यांनी एका भाडेकरूच्या घरात चोरी करून घरातून दीड लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 7) सकाळी सात वाजता सहकार चौक, मारुंजी येथे उघडकीस आली.

चंद्रकांत विठ्ठल माटेकर (वय 32, रा. सहकार चौक, मारुंजी, हिंजवडी) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी माटेकर सहकार चौकात संजय बुचडे यांच्या खोलीत भाड्याने राहतात. त्यांचे घर बुधवारी (दि. 6) दुपारी चार ते गुरुवारी सकाळी सात या कालावधीत कुलूप लावून बंद होते. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी कडी तोडून घरात प्रवेश केला.

घरातील कपाटात ठेवलेली दीड लाख रुपयांची रोख रक्कम चोरटयांनी चोरून नेली.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.