Hinjawadi crime News : क्रेनच्या धडकेत एकजण ठार

एमपीसी न्यूज – क्रेनने एका दुचाकीला मागून धडक दिली. यामध्ये दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. तर दुचाकी चालवणारा व्यक्ती जखमी झाला. हा अपघात मुंबई-पुणे सर्विस रोडवर ताथवडे येथे शनिवारी (दि. 26) दुपारी पावणेचार वाजता घडला.

रामू पासवान (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी घुरहू घिशियावान शर्मा (वय 39, रा. थेरगाव) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भीम सीताराम चव्हाण (रा. वाकड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुंबई-पुणे महामार्गाच्या सर्विस रोडने क्रेन (एम एच 14 / जी एच 4124) घेऊन जात होता. त्यावेळी फिर्यादी शर्मा आणि त्यांचा मयत कामगार दोघेजण दुचाकीवरून जात होते. आरोपी चव्हाण याने क्रेनने शर्मा यांच्या दुचाकीला मागून धडक दिली.

या अपघातात शर्मा यांचा कामगार रामू गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. शर्मा हे देखील जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती न देता आरोपी क्रेन चालक चव्हाण पळून गेला.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.