Hinjawadi crime News : दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगातील पल्सर दुचाकीने बुलेटला जोरदार धडक दिली. यामध्ये बुलेटवरील सहप्रवाशाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 4) दुपारी मारूंजी येथे घडली.

बशीर पापालाल शेख (वय 52) असे अपघातात मृत्यू झालेल्या बुलेटवरील सहप्रवाशाचे नाव आहे. जाफर मेहमूद इनामदार (वय 41, रा. कोंढवा, पुणे) यांनी रविवारी (दि. 4) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बबन कुंडलिक बनसोडे (वय 36, रा. मारूंजी गावठाण, ता. मुळशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाफर हे आपल्या बुलेटवरून त्यांचे दाजी मयत बशीर शेख यांच्यासोबत चालले होते.

रविवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास ते मारूंजी येथे आले असता बनसोडे यांच्या पल्सन दुचाकीने फिर्यादी जाफर यांच्या बुलेटला जोरदार धडक दिली. या अपघातात जाफर हे किरकोळ जखमी झाले तर बशीर शेख हे गंभीर जखमी होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.