Hinjawadi Crime News : माण मधून एक लाखाचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज – सामाजिक सुरक्षा विभागाने करवाई करत माणमधून 94 हजार 900 रुपयांचा विमल पान मसाला, आरएमडी गुटखा आणि व्ही / 1 तंबाखू जप्त केली. तसेच दुचाकी, मोबाईल असा एकूण एक लाख 49 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सिकंदर उके खान (वय 34, रा. राजस्थान) याच्यासह दोघांच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिलेल्या माहीतीनुसार, माण येथे लासुंडे वस्तीमध्ये आरोपी सिकंदर आणि त्याचा एक साथीदार बेकायदेशीरपणे गुटख्याची साठवणूक करुन त्याची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन छापा मारुन कारवाई केली.

त्यात 94 हजार 900 रुपयांचा विमल पान मसाला, आरएमडी, व्ही/1 तंबाखू, 35 हजारांची एक दुचाकी, 20 हजारांचे दोन मोबाईल असा एकूण एक लाख 49 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.