Hinjawadi crime News : बांधकाम साईटवरुन एक लाखांचे स्टील आणि बाईंडिंग वायर चोरीला

एमपीसी न्यूज – जांबे (jambe) येथील एका बांधकाम साईटवरून (construction site) अज्ञात चोरट्यांनी एक लाख 11 हजार 832 रुपयांचे स्टील आणि बाइंडिंग वायर चोरून (stolen)  नेल्या. हा प्रकार गुरुवारी (दि. 21) सकाळी अकरा वाजता उघडकीस आला.

सागर शिवाजी पाटील (वय 30, रा. जांबे. ता. मुळशी. मूळ रा. नाशिक) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjawadi Police station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जांबे गावात शिवाजी बुचडे यांच्या जागेत बांधकाम सुरु आहे. त्या बांधकाम साईटवरून बुधवारी सायंकाळी साडेसात ते गुरुवारी सकाळी अकरा या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी एक लाख 11 हजार 832 रुपयांचे स्टील आणि बाइंडिंग वायर चोरून नेल्या.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.