Hinjawadi crime News : ऑनलाईन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; तेरा मुलींची सुटका

हिंजवडी पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज – ऑनलाईन माध्यमातून ग्राहकांचा शोध घेऊन वेश्या व्यवसाय चालवणा-या एका टोळीचा हिंजवडी पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईमध्ये पोलिसांनी तब्बल 13 तरुणींची सुटका केली, तर एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

अर्जुन प्रेम मल्ला (वय 36, रा. विमाननगर, पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह त्याच्या अन्य दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड यांनी फिर्याद दिली.

आरोपी www.punecityescort.com या वेबसाईटच्या माध्यमातून वेश्या व्यवसायासाठी फोन क्रमांक ग्राहकांना पुरवत असत. ग्राहकांनी संपर्क केल्यानंतर त्यांना मुलींचे फोटो पाठवले जात.

_MPC_DIR_MPU_II

त्यातून ग्राहकाने मुलगी निवडल्यानंतर त्यांना पाहिजे असलेल्या ठिकाणी मुलींना पाठवले जात. त्याबदल्यात संबंधित ग्राहकांकडून तब्बल आठ हजार ते 20 हजार एवढी रक्कम घेतली जात.

या सेक्स रॅकेटची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सोशल मीडियाचा वापर करून बनावट ग्राहक आरोपीकडे पाठवले. त्यातून पोलिसांनी 13 महिलांची सुटका करत एकाला अटक केली. आरोपीकडून एक कार, मोबाईल फोन असा एकूण चार लाख 10 हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक आयुक्त गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे, उपनिरीक्षक मुदळ, समाधान कदम, पोलीस अंमलदार किरण पवार, नितीन पराळे, विजय घाडगे, आकाश पांढरे, रवी पवार, सागर जाधव, ओम कांबळे, दत्तात्रय शिंदे, रेखा धोत्रे, पूनम आल्हाट, सुप्रिया सानप, भाग्यश्री जमदाडे, सोनाली ढोणे, तेजश्री म्हैशाळे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.