_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Hinjawadi Crime News : स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा

0

एमपीसी न्यूज – स्पा सेंटरमध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर हिंजवडी पोलिसांनी छापा मारला. यामध्ये पोलिसांनी एकाला अटक केली असून एका महिलेची सुटका केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 9) दुपारी म्हळुंगे येथे करण्यात आली.

सुनास रचन मसी (वय 34, र म्हाळुंगे, ता. मुळशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक यशवंत साळुंखे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाळुंगे येथे तीर्थ आयटी पार्कच्या मागील बाजूला स्नेवा स्पा सेंटरमध्ये बेकायदेशीररित्या वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी दुपारी पाच वाजता स्पा सेंटरवर छापा मारला. या मध्ये पोलिसांनी एका महिलेची सुटका केली.

या महिलेकडून आरोपी जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment