Hinjawadi Crime News : अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करणाऱ्या पोलिसांना धक्काबुक्की

एमपीसी न्यूज – अवैधरीत्या दारू विक्री करणा-या व्यक्तीच्या विरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना दारू विक्रेत्याने अरेरावी आणि धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. ही घटना मंगळवारी (दि. 13) रात्री वांगदरे वस्ती, हिंजवडी येथे घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

भवानी ओमप्रकाश चंडालिया (वय 38, रा. सुभाषनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस नाईक सुरेश जायभाये यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भवानी मंगळवारी रात्री साडेआठ वाजता वांगदरे वस्ती, हिंजवडी येथे अवैधरीत्या दारू विक्री करत होता. त्याबाबत माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्याच्यावर कारवाई केली.

भवानीच्या विरोधात कारवाई करत असताना त्याने पोलीस नाईक जायभाये आणि त्यांच्या स्टाफ सोबत अरेरावी केली. त्यांना धक्काबुकी करून फिर्यादी यांचा टीशर्ट फाडला. पोलिसांसोबत झटापट करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.