Hinjawadi Crime News : जेवण देण्यासाठी उशीर झाल्याने हॉटेलमध्ये राडा; रिसेप्शनिस्ट तरुणीचा विनयभंग

एमपीसी न्यूज – जेवण देण्यासाठी उशीर झाल्याच्या कारणावरुन 19 जणांच्या टोळक्याने हॉटेलमध्ये राडा घातला. हॉटेलमधील साहित्याची तोडफोड केली. तसेच रिसेप्शनिस्ट तरुणीचा विनयभंग केला. याबाबत 19 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार रविवारी (दि. 28) रात्री दहा वाजता ओयो टाऊनहाऊस हॉटेल येथे घडला.

सलमान मोहम्मद अकरम (वय 24, रा. घाटकोपर वेस्ट, मुंबई), अनिल गुप्ता (वय 24, रा. नालासोपारा ईस्ट, ठाणे), धर्मेंद्र कुमार (वय 28, रा. भायंदर वेस्ट, ठाणे), सूर्यकांत साहू (वय 31, रा. साकीनाका, मुंबई), अनिल तानाजी पराडकर (वय 39, रा. आरे कॉलनी, मुंबई), गौतम शर्मा (वय 42, रा. खगरिया बिहार), सुहास रंजन (वय 51, रा, फत्तेबाद बिहार), कुलदीप विश्वकर्मा (वय 33, रा. गिरिडीह झारखंड), राजकुमार यादव (वय 40, रा. गिरिडीह, झारखंड), बालू शाहू (वय 40, रा. घाटकोपर वेस्ट, मुंबई), भानुप्रताप सिंग (वय 30, रा. पतारीहा, गढवा, झारखंड), प्रतीक पवार (वय 27, रा. प्रतापगड, उत्तरप्रदेश), विजय लालजी यादव (वय 23, रा. खार वेस्ट, मुंबई) इतर पाच ते सहा इसम अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत हॉटेल चालक महिलेने मंगळवारी (दि. 30) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे फिर्यादी यांच्या हॉटेलमध्ये जेवणासाठी आले होते. त्यांनी जेवणाची ऑर्डर दिली.

मात्र हॉटेलमधील वेटरला ऑर्डर देण्यासाठी उशीर झाला. या कारणावरून आरोपींनी हॉटेलमधील 16 डिनर प्लेट, 11 खुर्च्या, रूममधील टीव्ही, बेड मॅट्रेस, बाथरूमच्या काचा, आठ पिलो कव्हर्स, चार बेडशीट फाडून व इतर साहित्य फोडून एकूण 65 हजारांचे नुकसान केले.

त्यानंतर हॉटेल मधील कर्मचा-यांनी आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी कर्मचा-यांना शिवीगाळ केली. आरोपी सुहास रंजन याने रिसेप्शनिस्ट तरुणीसोबत अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.