Hinjawadi Crime News : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने महिलेवर बलात्कार केला. ही घटना बावधन येथे घडली.

सारंग मारुती हाते (वय 31, रा. बावधन, पुणे. मूळ रा. बोधेनगर, चिखलगाव, वणी, जि. यवतमाळ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत पीडित महिलेने बुधवारी (दि. 17) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 6 ऑगस्ट 2019 पासून 6 नोव्हेंबर 2020 या कालावधीत आरोपीच्या घरी घडला.

आरोपीने पीडित महिलेसोबत मैत्री करून तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यातून त्याने बावधन येथील त्याच्या घरी महिलेसोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच आरोपीने महिलेला मारहाण करून शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like