Hinjawadi Crime News : कोरोना नियमांचे उल्लंघन करणारे 19 हॉटेल, चायनीज सेंटर व रेस्टॉरंट सील

एमपीसी न्यूज – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हिंजवडी परिसरातील 19 हॉटेल, हुक्काबार, चायनीज व रेस्टॉरंट सील करण्यात आले आहेत. सोमवारी (दि.24) ही कारवाई करण्यात आली.

मोफासा हॉटेल ( मुंडे बस्ती, बावधन), हॉटेल रुडलाऊंज (हिंजवडी), हॉटेल ठेका रेस्टो लॉन्ज (भुमकर चौक ते हिंजवडी रोड), हॉटेल अशोका बार ॲन्ड रेस्टो (शिवाजी चौक, हिंजवडी), हॉटेल बॉटमअप (भटेवारा नगर, हिंजवडी), श्री चायनिज ॲन्ड तंदुर पॉईंट ( माण), महाराष्ट्र हॉटेल भोजनालय चायनिज (बुचडेवस्ती), हॉटेल पुणेरी (बावधन), हॉटेल आस्वाद ( इंदिरा कॉलेजवळ, हिंजवडी), हॉटेल शिवराज (पुनावळे), कविता चायनिज सेंटर( शिवार वस्ती मारुंजी), हॉटेल ग्रिनपार्क स्टॉट ऑन (मुंडे वस्ती, बावधन), फॉर्म्युन डायनिंग एल.एल.पी. उर्फ ठिकाणा हॉटेल, व्हाईट स्क्वेअर बिल्डिंग ( हिंजवडी), हॉटेल टिगो (चांदणी चौक, बावधन), एस.पी. फॉमिली रेस्टॉरंट (हिंजवडी ते कासारसाई रोड), वॉटर मल्टीक्युझिन रेस्टॉस्ट ॲन्ड लॉज (बावधन खुर्द, पौड रोड), योगी हॉटेल (पुणे-बेंगलोर हायवे शेजारी, ताथवडे), यश करण बिअर शॉपी ( हिंजवडी), अशी कारवाई करण्यात आलेल्या हॉटेल, रेस्टॉरंट्स यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांची एकूण तीन पथके तयार करण्यात आली होती.

हिंजवडी- माण, पुणे-बेंगलोर हायवे व बावधन परिसरात नेमलेल्या या पथकांना संबंधित हॉटेल व आस्थापना लॉकडाऊन नियमांचे पालन करत नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हे हॉटेल आणि आस्थापना सिल करण्याबाबत तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी, मुळशी यांना लेखी प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

त्याप्रमाणे राज्य शासनाने लावलेला लॉकडाऊन संपेपर्यंत या आस्थापना सिल बंद करण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.