Hinjawadi Crime News : बावधनला हॉटेलमध्ये अवैध दारू, हुक्का विक्री; हॉटेल मॅनेजरला अटक

एमपीसी न्यूज – अवैध दारू आणि हुक्का विक्री प्रकरणी दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत  हॉटेल  मॅनेजरला अटक करण्यात आली आहे. गुरूवारी (दि. 11) रात्री दहाच्या सुमारास बावधन येथील मल्टी क्यूझाईन रेस्टॉरंट याठिकाणी सामाजिक सुरक्षा पथकाने ही कारवाई केली आहे.

मॅनेजर प्रशांत प्रकाश बेलोसे (वय 27, रा. शिवणे, पुणे), मॅनेजर स्वप्निल पांडुरंग मोहिते (वय 30, रा. मार्केटयार्ड, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. तर, श्रवण पुजारी (वय 26, रा. सिंहगड रोड) या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ग्राहकांना  हॉटेलमध्ये अवैध दारू आणि हुक्का पिण्यासाठी उपलब्ध करून दिला. सामाजिक सुरक्षा पथकाने छापा टाकला त्यावेळी 2,610 रूपयांची अवैध दारू व 23,400 रूपयांचा हुक्का पिण्याचे साहित्य आढळून आले.

सहाय्यक पोलीस फौजदार थोरवे अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.