Hinjawadi crime news : एजंटने कार शोरूमला घातला दहा लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज – कार शोरूममध्ये कमिशन बेसिसवर काम करणा-या एका एजंटने शोरूमला 10 लाखांचा गंडा घातला आहे. कार विक्री केल्यानंतर आलेले पैसे शोरूमला न देता त्याचा अपहार केला. याबाबत संबंधित एजंटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल काबरा (रा. उजवी भुसारी कॉलनी, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी शोरूमचे व्यवस्थापक हेमंत नीलकंठ जाधव (वय 43, रा. शनिवार पेठ, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाळुंगे येथे सुमनकीर्ती कार्स या शोरूममध्ये फिर्यादी जाधव व्यवस्थापक म्हणून काम करतात. तर आरोपी काबरा त्याच शोरूममध्ये कमिशन बेसिसवर काम करत आहे. शोरूममधून नवीन आणि जुन्या कार विकल्या जातात.

आरोपी काबरा याने साडेसहा लाखांची मारुती डिझायर कार (एमएच 45 / एडी 9045) आणि साडेतीन लाखांची वॅगन आर कार (एमएच 12 / पीसी 5211) दोन ग्राहकांना विकल्या. त्यानंतर ग्राहकांकडून आलेले दहा लाख रुपये काबरा याने शोरूमकडे जमा न करता स्वतः कडे ठेऊन त्याचा अपहार केला.

याबाबत काबरा याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.