Hinjawadi crime News : गावी जातो म्हणून ड्रायव्हर कार घेऊन गेला तो परतलाच नाही

शेख याने फिर्यादींचे फोन देखील स्वीकारणे बंद केले.

एमपीसी न्यूज – गावी जातो म्हणून ड्रायव्हर मालकाची कार घेऊन गेला. त्यानंतर ड्रायव्हरने मालकाचे फोन स्वीकारणे बंद केले. कारमधील जीपीएस डिव्हाईस देखील बंद करून करून टाकले. हा प्रकार मारुंजी येथील ब्रायबेंट ओयो स्टे येथे 1 सप्टेंबर रोजी घडला. या प्रकरणी संबंधित ड्रायव्हरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेख महमद रफी (वय 30, रा. सांगवी) असे गुन्हा दाखल झालेल्या ड्रायव्हरचे नाव आहे. याप्रकरणी वैभव अनिल गुप्ता (वय 22, रा. ब्रायबेंट ओयो स्टे, मारुंजी, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वैभव यांची बहिण प्रियंका अनिल गुप्ता यांच्या नावावर एमएच 14 / एचडब्ल्यू 4948 ही टाटा कंपनीची टीगोर कार आहे. या कारवर आरोपी शेख ड्रायव्हर म्हणून काम करत होता.

1 सप्टेंबर रोजी शेख याने गावी जातो असे सांगून कार नेली. त्यानंतर शेख अद्याप पर्यंत गावाहून परत आला नाही. कारमधील जीपीएस सिस्टीम बंद झाली आहे.

शेख याने फिर्यादींचे फोन देखील स्वीकारणे बंद केले. त्यामुळे शेख याने फिर्यादी यांची कार स्वतः कडे ठेऊन कारचा अपहार केला असल्याची तक्रार पोलिसात नोंदवण्यात आली आहे.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.