Hinjawadi crime News : दारु पिताना झालेल्या शिवीगाळीच्या कारणावरून तरुणाच्या छातीत चाकू भोकसला

एमपीसी न्यूज – दारु पिण्यासाठी चार ते पाच जण एकत्र बसले होते. यावेळी झालेल्या शिवीगाळीच्या कारणावरून एकाच्या छातीत सुरा भोसकून त्याला जखमी करण्यात आले. ही घटना शुक्रवारी (दि.9) रात्री दीडच्या सुमारास हाॅटेल टेकटोणा फेज-3, माण या ठिकाणी घडली.

या प्रकरणी हल्ल्यात जखमी झालेले बिन्दरुलाल जगत लाल (वय 35, रा. माण, मुळशी, मूळगाव – उत्तराखंड ) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार हल्लेखोर मनीष सचिन राणे (वय 22, रा. माण, मुळशी, मुळगाव – रा. अंबवडे, बु, सातारा ) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, आरोपी आणि इतर कर्मचारी यांच्या सोबत दारु पित बसले होते. यावेळी फिर्यादी यांनी एका कर्मचार्‍यास शिवीगाळ केली. त्यावरुन ‘शिव्या का दिल्या’ असे म्हणत आरोपी राणे याने फिर्यादीच्या छातीत सुरा भोसकून त्यांना जखमी केले.

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. हिंजवडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.