Hinjawadi Crime News : मुंबई बेंगलोर महामार्गावर गॅरेजमध्ये चोरी

एमपीसी न्यूज – मुंबई बेंगलोर महामार्गावर असलेल्या एका गॅरेजमध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. गॅरेजमधून रोख रक्कम आणि गाडीच्या बॅटऱ्या चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. ही घटना सोमवारी (दि. 17) सकाळी सत्यजित मोटर्स या गॅरेज मध्ये उघडकीस आली.

सचिन महादेव दगडे (वय 43, रा. भुगाव रोड, बावधन) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दगडे यांचे मुंबई बेंगलोर महामार्गावर बावधन बुद्रुक येथे सत्यजित मोटर्स नावाचे गॅरेज आहे. 15 मे दुपारी साडेतीन ते 17 मे सकाळी साडेनऊ या कालावधीत त्यांचे गॅरेज कुलूप लावून बंद होते. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी कंपाऊंडच्या भिंतीवरून उडी मारून गॅरेजच्या ऑफिसचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला.

टेबलचे ड्रावर उघडून त्यातून गाड्यांच्या चाव्या आणि 10 हजार रुपये रोख रक्कम घेतली. तसेच ड्रावर मधून घेतलेल्या चावीच्या सहाय्याने गाड्यांचे बॉनेट उघडून 36 हजार रुपये किमतीच्या बॅटऱ्या चोरून नेल्या. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.