Hinjawadi Crime News : बावधनमधून तीन सायकली चोरट्यांनी पळवल्या

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरातून चोरीस जाणाऱ्या मोटार सायकलींची संख्या अधिक आहे. त्यातच आता सायकलीही चोरीस जाऊ लागल्या आहेत. बावधन परिसरातून तीन सायकल चोरीस गेल्याची नोंद शुक्रवारी (दि. 13) हिंजवडी पोलीस ठाण्यात झाली आहे.

सायकल चोरीच्या पहिल्या घटनेत सौमित्र सुभाष चांदोरकर (वय 35, रा. हायक्‍लास रेसिडन्सी, बावधन, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची 15 हजार रुपये किंमतीची हिरव्या रंगाची मोन्ट्रा कंपनीची सायकल 4 नोव्हेंबर रोजी सोसायटीच्या पार्किंगमधून चोरून नेली आहे.

सायकल चोरीच्या दुसऱ्या घटनेत सुमीत धमेंद्रदेव शुक्‍ला (वय 33, रा. पुराणिक अभितांते सोसायटी, बावधन) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शुक्‍ला यांची 16 हजार रुपये किंमतीची भगवी आणि काळ्या रंगाची सायकल सोसायटीच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना 5 नोव्हेंबर रोजी उघडकीस आली.

सायकल चोरीच्या तिसऱ्या घटनेत नीलेश जयंत केळकर (वय 47, रा. सनविंड सोसायटी, बावधन) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. केळकर यांची 18 हजार रुपये किंमतीची पिवळ्या रंगाची सायकल राहत्या घराच्या पार्किंगमधून चोरून नेली आहे. ही घटना 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 ते सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान घडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.