Hinjawadi Crime News : वर्गात झालेल्या किरकोळ भांडणावरून तिघांनी मिळून वर्गमित्राला दांडक्याने मारले

एमपीसी न्यूज – वर्गात झालेल्या किरकोळ भांडणाच्या कारणावरून तिघांनी मिळून वर्गमित्राला लाकडी दांडक्याने मारून जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. 20) बावधन येथे अरंहित कॉलेज समोर घडली.

यश श्रीहरी सुर्वे (वय 18, रा. सुतारवाडी, पाषाण) यांनी याप्रकरणी गुरुवारी (दि. 21) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शंतनू करजावणे (रा. बावधन), त्याचा चुलत भाऊ (नाव माहिती नाही), साईराज दगडे (रा. बावधन) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरंहित कॉलेज बावधन येथे फिर्यादी यांच्या वर्गात शिकणारा मुलगा शंतनू, त्याचा चुलत भाऊ आणि साईराज या तिघांनी कॉलेजमध्ये झालेल्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादी यांना शिवीगाळ केली. तसेच हाताने मारहाण करून साईराज दगडे याने हातातील लाकडी दांडक्याने फिर्यादी यांच्या डोक्यात मारून जखमी केले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.