Hinjawadi Crime News : कत्तलीसाठी बैलांची वाहतूक; एकास अटक

एमपीसी न्यूज – कत्तलीसाठी दोन बैलांची वाहतूक केल्याप्रकरणी दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील एकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना लक्ष्मी चौक, हिंजवडी येथे मंगळवारी (दि. 8) सकाळी आठच्या सुमारास घडली.

सफदर हयदर कुरेशी (वय 20, रा. खडकी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यासह सलीम सय्यद (रा. देहूरोड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतीक विक्रम भेगडे (वय 23, रा. तळेगाव दाभाडे) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे एका टेम्पोमधून दोन बैल कोंढवा येथील कसाई मोहल्ल्यात कत्तलीसाठी बैल घेऊन जात होते. याबाबत पोलिसांनी कारवाई करत दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यातील एकाला पोलिसांनी अटक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.