Hinjawadi Crime News : देव्हाऱ्याखाली लपवलेली बावीसशे लिटर गावठी दारू जप्त

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने दत्तवाडी नेरे येथे कारवाई केली. त्यात देव्हाऱ्याखाली लपवून ठेवलेली 2 हजार 200 लिटर गावठी दारू जप्त केली. याप्रकरणी तीन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्योती अविनाश मारवाडी (वय 30, रा. दत्तवाडी रोड, नेरे) आणि तिच्या दोन महिला साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सामाजिक सुरक्षा विभागाचे कर्मचारी हद्दीत गस्त घालत असताना दत्तवाडी, नेरे येथे आरोपी मारवाडी हिने घरात दारूसाठा करून ठेवल्याची माहिती त्यांना मिळाली.

_MPC_DIR_MPU_II

त्यानुसार, पथकाने सोमवारी (दि. 8) छापा मारून देव्हाऱ्याखाली लपवून ठेवलेले दारूचे 63 बॅरल जप्त केले.

दारूसाठा करण्यासाठी आरोपी मारवाडी हिने घरातच एक टाकी बांधली होती. याबाबत पोलिसांना संशय येऊ नये यासाठी टाकीत प्रवेश करण्याच्या ठिकाणी देवाचे फोटो असलेला देव्हारा ठेवला होता. मात्र, पोलिसांकडे खबर पक्की असल्याने मारवाडीचे बिंग फुटले.

पोलिसांनी देवघराखाली असलेल्या हौदातून 63 बॅरल बाहेर काढले. त्यात तब्बल 2 हजार 200 लिटर गावठी दारू होती. हा साठा पोलिसांनी जप्त केला आहे.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.