Hinjawadi Crime News : गुटखा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक; 24 लाखांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज – गुटखा विक्रीसाठी आलेल्या दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 11 लाख एक हजार 920 रुपयांचा गुटखा तसेच दोन वाहने आणि मोबाईल फोन असा एकूण 24 लाख 17 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी (दि. 24) तापकीरवस्ती, सुसगाव येथे करण्यात आली.

छोटूराम रत्नाराम देवासी (वय 22, रा. हेमराज चौक, कोथरूड. मूळ रा. राजस्थान), रामदेव रत्नाराम सोडा (वय 24, रा. गणराज चौक, बाणेर, पुणे. मूळ रा. राजस्थान) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस नाईक कुणाल शिंदे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश बिरादार यांना माहिती मिळाली की, तापकीरवस्ती, सुसगाव येथे एक ब्रिझा कार (एम एच 12 / आर टी 0988) आणि एक बोलेरो पिकअप (एम एच 12 / क्यू जी 8316) थांबले असून त्यांच्यात आपसात गुटखा विक्री केला जात आहे. त्यानुसार सांगवी पोलिसांनी परिसरात सापळा लावून दोन्ही वाहनांना ताब्यात घेतले. तसेच छोटूराम आणि रामदेव यांना देखील ताब्यात घेण्यात आले. दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांनी हा गुटखा विक्रीसाठी आणला असल्याचे सांगितले.

दोघांकडून 11 लाख एक हजार 920 रुपयांचा गुटखा, 13 लाख 16 हजारांच्या दोन गाड्या आणि मोबाईल फोन असा एकूण 24 लाख 17 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश बिरादार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काटे, आर एस मुदळ, सहाय्यक पोलीस फौजदार वायबसे, पोलीस अंमलदार भालेराव, बाळकृष्ण शिंदे, बंडू मारणे, कुणाल शिंदे, आतिक शेख, हणमंत कुंभार, सुभाष गुरव, श्रीकांत चव्हाण, पालवे, दत्ता शिंदे, राणे, गुमलाडू यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.