Hinjawadi Crime News : पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकावणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – हिंजवडी येथे चाफेकर कंपनीच्या गेट जवळ रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणाचा मोबाईल फोन हिसकावून घेणाऱ्या दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. मोबाईल फोन हिसकावून घेण्याची घटना 23 फेब्रुवारी रोजी घडली होती. याबाबत 16 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश वजीर राठोड (वय 21, रा. आयनळेवस्ती, मुलखेड, ता. मुळशी. मूळ रा. गांधीनगर), गुजरात, अल्ताफ उर्फ अली नफीस शेख (वय 21, रा. नांदे लवळे रोड, ता. मुळशी. मूळ रा. आंबेडकरनगर, उत्तरप्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत असलम आलम इक्बाल अहमद (वय 20, रा. हिंजवडी. मूळ रा. झारखंड) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 फेब्रुवारी रोजी रात्री सव्वाआठ वाजताच्या सुमारास फिर्यादी हिंजवडीमधील चाफेकर कंपनीच्या गेट समोरून रस्त्याने पायी चालत जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या हातावर जोरात फटका मारून त्यांचा 12 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला.

त्यानंतर फिर्यादी यांनी ऑनलाईन तक्रार दिली होती. 16 जून रोजी याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी दोन्ही चोरट्यांना अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.