Hinjawadi Crime News : घरामध्ये तंबाखू, गुटखा साठवल्या प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज – शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि तंबाखू घरात साठवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई हिंजवडी पोलिसांनी शनिवारी (दि. 16) सायंकाळी भगवान नगर, भूमकर चौक, वाकड येथे केली.

प्रवीण अरुण गायकवाड (वय 39, रा. भूमकर चौक, वाकड), सुरेश कानाराम परिहार (वय 22, रा. वाकड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई अमित दत्तात्रय जगताप यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि तंबाखू आरोपी सुरेश याने आरोपी प्रवीण याला विकला. प्रवीण याने त्याच्या घरात हा माल साठवून ठेवला.

याबाबत हिंजवडी पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी कारवाई करत प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू असा एकूण 74 हजार 544 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.