Hinjawadi Crime News : कंपनीने दिलेल्या दोन लॅपटॉपचा अपहार

एमपीसी न्यूज – महिलेला कंपनीने दिलेल्या दोन लॅपटॉपचा एका महिलेने अपहार केला. ही घटना सोमवारी (दि. 27) मारुंजी रोड, वाकड येथे उघडकीस आली.

याप्रकरणी एका महिलेने मंगळवारी (दि. 28) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका 32 वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला एका कंपनीत काम करत असून तिला कंपनीने कंपनीच्या कामासाठी 50 हजार रुपये किमतीचे दोन लॅपटॉप दिले आहेत. ते लॅपटॉप फिर्यादी महिलेने शनिवारी (दि. 26) आरोपी महिलेच्या फ्लॅट मध्ये ठेवले. ते लॅपटॉप आरोपी महिलेने कुठेतरी घेऊन जाऊन त्याचा अपहार केला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.