Hinjawadi Crime News : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून कामावर जात असताना अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना 10 जून रोजी मुंबई-बंगळुरू महामार्गावर हिंजवडी परिसरात शनी मंदिराजवळ घडली.

प्रमोद दिगंबर कुलकर्णी असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई ज्योतिराम झेंडे यांनी 15 जुलै रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत प्रमोद कुलकर्णी हे त्यांच्या दुचाकी वरून (एम एच 12 / डी बी 2945) मुंबई-बंगळुरू महामार्गावरून कामावर जात होते. सकाळी सव्वा आठ वाजताच्या सुमारास ते हिंजवडी परिसरातील शनी मंदिराजवळ आले असता त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली.

यामध्ये गंभीर जखमी झालेल्या कुलकर्णी यांचा मृत्यू झाला. दरम्यान अज्ञात वाहन चालक जखमी कुलकर्णी यांना वैद्यकीय मदत न देता पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.