Hinjawadi Crime News : लिफ्ट दिलेल्या दुचाकीस्वाराला मारहाण करून लुटले

एमपीसी न्यूज – लिफ्ट दिलेल्या तरुणाला एकाने बेदम मारहाण केली. त्यानंतर लिफ्ट देणाऱ्या तरुणाचा मोबाईल फोन, रोख रक्कम आणि दुचाकी जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. 4) रात्री एक वाजताच्या सुमारास वाकड हिंजवडी रोडवर कस्तुरी हॉटेलच्या समोर घडली.

विश्वास कल्याणराव ऊगले (वय 25, रा. आदर्शनगर, हिंजवडी गावठाण) यांनी याबाबत हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री एक वाजताच्या सुमारास फिर्यादी विश्वास त्यांच्या मोपेड दुचाकीवरुन वाकड हिंजवडी रोडवरून जात होते. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांना लिफ्ट मागितली. कस्तुरी हॉटेलच्या समोर आल्यानंतर आरोपीने त्याचे घर आले असल्याचा बहाणा सांगून दुचाकी थांबवली.

त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या दोन्ही पायांच्या नडगीवर आणि घोट्यावर मारून जखमी केले. त्यानंतर फिर्यादी यांचा मोबाईल फोन, दुचाकी आणि रोख रक्कम असा एकूण 41 हजार 600 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.