Hinjawadi Crime News : सासरच्या त्रासाला कंटाळून दोन महिलांच्या आत्महत्या

एमपीसी न्यूज – हिंजवडी परिसरात ताथवडे आणि मारुंजी येथे सासरच्या त्रासाला कंटाळून दोन महिलांनी आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. 10) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या प्रकरणात लक्ष्मण शरणप्पा अणकल (वय 27, रा. बापूजी वस्ती, ताथवडे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्या केलेल्या विवाहितेच्या भावाने याबाबत फिर्याद दिली आहे.

विवाहितेला मुलबाळ होत नसल्याच्या आणि इतर किरकोळ कारणांवरून वारंवार शारीरिक व मानसिक त्रास दिला. याबाबत विवाहितेने तिच्या आईकडे तक्रार देखील केली होती. मात्र आरोपीकडून होणारा त्रास कमी न झाल्याने 7 फेब्रुवारू रोजी रात्री तत्कालीन कारणावरून विवाहितेने स्कार्पच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

_MPC_DIR_MPU_II

दुस-या प्रकरणात नवनाथ शिवाजी सरगर (वय 31, रा. मारुंजी), सासू प्रेमल (वय 70), नणंद आशा (वय 35, रा. मोहननगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनाथ सरगर याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत आत्महत्या केलेल्या विवाहितेच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे.

आरोपी नवनाथ आणि इतर आरोपींनी मयत विवाहितेला घरगुती किरकोळ कारणावरून त्रास दिला. तिला घालून-पाडून बोलणे, तिला घरात एकटे सोडून निघून जाणे, घरात पत्नीची वागणूक न देणे असा त्रास वारंवार दिल्याने या त्रासाला कंटाळून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले.

विवाहितेने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.