Hinjawadi Crime News : प्रवासी घेण्यावरून ओला रिक्षा चालकाला मारहाण

एमपीसी न्यूज – प्रवासी घेण्यावरून वाद घालून ओला रिक्षा चालकाला मारहाण केली. याप्रकरणी दोन अनोळखी रिक्षाचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 27) पहाटे सव्वातीनच्या सुमारास भुमकर चौक हिंजवडी येथे घडली.

अर्जुन सोमनाथ ठोंबरे (वय 32, रा. खराडी, पुणे, मूळ रा. हिचरे, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी हिंदी बोलणारे दोन अनोळखी रिक्षाचालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रिक्षाचालक आहेत. पुणे स्टेशन येथे प्रवासी घेण्यावरून आरोपींनी फिर्यादीला हटकले होते. फिर्यादीने ओला बुक करून पॅसेंजर घेतले. ‘आम्ही भुमकर चौक या भागात राहतो पॅसेंजर कॅन्सल कर आम्ही घेऊन जातो, असे आरोपी फिर्यादीला म्हणाले. मात्र फिर्यादीने भाडे कॅन्सल केले नाही. त्या कारणावरून आरोपींनी भुमकर चौक येथे येऊन फिर्यादीला शिवीगाळ केली. रिक्षातील दांडके व हाताने मारहाण करून फिर्यादीला जखमी केले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.