Hinjawadi Crime News : वेबसाईट बनवून देण्याच्या बहाण्याने महिलेची दोन लाख 86 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज – वेबसाईट बनवून देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीने हिंजवडी येथील महिलेची दोन लाख 86 हजार 800 रुपयांची फसवणूक केली. तसेच महिलेच्या ईमेल आयडीचा पासवर्ड बदलून त्याचा गैरवापर केला. ही घटना 16 डिसेंबर 2020 ते 8 जुलै 2021 या कालावधीत ऑनलाईन घडली.

ईविका रादे ट्राॅजिक (वय 52, रा. हिंजवडी) यांनी याबाबत गुरुवारी (दि. 9) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमित अर्जुन सिंह (रा. सिवान, बिहार) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना वेबसाईट बनवून देण्याचे आमिष दाखवले. त्यापोटी फिर्यादी यांच्याकडून आरोपीने दोन लाख 86 हजार आठशे रुपये घेतले. पैसे घेऊन आरोपीने फिर्यादी यांना कोणत्याही प्रकारची वेबसाईट तयार करून दिली नाही. तसेच पाच जुलै 2021 ते 9 सप्टेंबर 2021 या कालावधीत आरोपीने फिर्यादी यांच्या मेल आयडीच्या पासवर्ड मध्ये बदल करून त्याचा गैरवापर केला. फिर्यादी यांच्या डिजिटल सहीचा पेन ड्राईव्ह त्यांच्या परवानगीशिवाय चोरून फिर्यादी यांच्या डिजिटल सहीचा गैरवापर करून फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सायबर सेलचे पोलीस निरीक्षक डॉ. संजय तुंगार तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.