Hinjawadi Crime News : गुटख्याची साठवणूक करणाऱ्या तरुणास अटक; साडेचार लाखाचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज – गुटखा विक्री करण्यासाठी त्याची साठवणूक केल्याप्रकरणी एका तरुणाला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चार लाख 66 हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 17) दुपारी मारुंजी रोड, हिंजवडी येथे करण्यात आली.

अनुप कुमार सिंग (वय 23, रा. बालाजी बिल्डिंग, मारुंजी रोड, हिंजवडी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई रवी प्रकाश पवार यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनुप कुमार सिंग याने त्याच्या घरामध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवला. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी आरोपीच्या घरावर छापा मारून कारवाई केली. यात पोलिसांनी चार लाख 66 हजार 576 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.