Hinjawadi Crime News : जेवणाचा डबा आणण्यासाठी हॉटेलवर गेलेल्या महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – जेवणाचा डबा आणण्यासाठी हॉटेलवर गेलेल्या महिलेचा तिच्या तोंडओळखीच्या एका तरुणाने विनयभंग केला. याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि. 12) रात्री नारायणनगर, हिंजवडी येथे गणेश हॉटेलमध्ये घडली.

समृद्ध पोळ (वय 25, रा. नारायणनगर, हिंजवडी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पिडीत महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 13) फिर्यादी दिली.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या पीजीमध्ये राहतात. सोमवारी रात्री सव्वानऊ वाजता त्या त्याच्या पीजी जवळ असलेल्या गणेश हॉटेलमध्ये जेवणाचा डबा आणण्यासाठी गेल्या. डबा मिळण्यासाठी काही वेळ लागत असल्याने फिर्यादी हॉटेल समोर असलेल्या प्लास्टिक स्टूलवर बसल्या.

त्यावेळी आरोपी तिथे आला. त्याने स्टूलला लाथ मारून फिर्यादी यांचे केस ओढले. त्यानंतर त्याने फिर्यादी यांच्याशी अश्लील गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.