Hinjawadi crime News : बांधकाम साईटवरून तीन लाखांचे ॲल्युमिनियम साहित्य लंपास

एमपीसी न्यूज – बांधकाम साईटवरून ( Construction Site) अज्ञात चोरट्यांनी तीन लाख रुपयांचे ॲल्युमिनियम मटेरियल चोरून ( Aluminium Material Theft) नेले. ही घटना 8 जानेवारी रोजी पहाटे पावणे दोन ते तीन वाजताच्या सुमारास शेरेनिटी प्रोजेक्ट ( Sherenity Project)  फेज तीन, हिंजवडी ( Hinjawadi ) येथे घडली.

याबाबत 26 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तानाजी आनंदा गायकवाड (वय 51, रा. पिंपळे निलख) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची हिंजवडीमध्ये शेरेनिटी प्रोजेक्ट फेज तीन ही बांधकाम साईट सुरु आहे. त्या साईटवर उघड्यावर ठेवलेले दोन लाख 99 हजार 638 रुपये किमतीचे ॲल्युमिनियम मटेरियल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले.

हिंजवडी पोलीस ( Hinjawadi Police ) तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.