Hinjawadi Crime : पहाटेच्या वेळी कारमधून दोन मोबाईल फोन जबरदस्तीने पळवले

एमपीसी न्यूज – कारमध्ये झोपलेल्या चालकासोबत झटापटी करून चोरट्यांनी दोन मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. 22) पहाटे पाच वाजताच्या सुमारास बावधन येथील सर्व्हिस रोडवर घडली.

राहुल सुरेश सांबरेकर (वय 47, रा. नाशिक रोड, नाशिक) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे फिर्यादी बावधन येथील सर्व्हिस रोडवर त्यांच्या कारमध्ये (एम एच 14 / बी एक्स 6767) झोपले होते. पहाटे पाच वाजताच्या सुमारास एका चोरट्याने कारचा दरवाजा उघडून कारच्या डॅशबोर्डवर ठेवलेले 30 हजारांचे दोन मोबाईल फोन फिर्यादी यांच्यासोबत झटापटी करून जबरदस्तीने चोरून नेले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.