Hinjawadi Crime : बांधकाम साईटवरून दोन लाखांच्या वायर चोरीला

एमपीसी न्यूज – बांधकाम साईटवरुन 2 लाख 13 हजारांची वायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना पुनावळे येथे शुक्रवारी (दि. 6) रात्री दहा ते शनिवारी (दि. 7) सकाळी दहा या कालावधीत घडली.

योगेश साहेबराव पाटील (वय 35, रा. च-होली) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाटील हे इको पॉलिटन कन्स्ट्रक्शन कंपनीत सिक्युरिटी ऑफिसर म्हणून काम करतात. त्यांच्या कंपनीची पुनावळे येथे बांधकाम साईट सुरू आहे. त्या साईटवरुन शुक्रवारी रात्री दहा ते शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी 2 लाख 13 हजार 205 रुपये किमतीच्या वायर चोरून नेल्या.

याबाबत साईटवरील सुरक्षा रक्षक राम यादव आणि कामगार मेहबूब अन्सारी यांनी फिर्यादी पाटील यांना सांगितले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.