-MPC-TOP-MOST-BANNER-I

Hinjawadi : सराईत गुन्हेगारास पिस्तुलासह अटक

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज- पिस्तूल घेऊन थांबलेल्या एका सराईत गुन्हेगारास हिंजवडी पोलिसांनी अटक केली. ही घटना सोमवारी (दि. ७) रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास ताथवडे येथे घडली.

आसिफ मंहम्मद शेख (वय 20, रा. कोयते वस्ती, पुनावळे, पुणे) मुळ रा. मु. पो. दुधनी ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस नाईक कुणाल शिद यांना आरोपीबाबत माहिती मिळाली. त्यानुसार सोमवारी रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास पोलिसांनी मुंबई बंगळुरू महामार्गावर ताथवडे येथे सापळा रचून आसिफ याला संशयावरून ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टचे आतील बाजुस पोटाचे जवळ एक गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस मिळून आले. यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली. आसिफ याच्यावर एक खून आणि एक खुनाचा प्रयत्न केल्याचा, असे एकूण दोन गुन्हे दाखल आहेत .

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सह आयुक्त प्रकाश मुत्याल, अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त विनायक ढाकणे, सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त श्रीकांत मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड, उपनिरीक्षक अनुरूध्द गिजे, मिनीनाथ वरूडे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn